माझा परीचय



मी संजय सदानंद वायंगणकर
रहाणार, नालासोपारा पश्चीम,
एका सामान्य, गरीब घरात माझा जन्म झाला. लहानपण खुप वाईट गेले. दोन वेळचे जेवण कसेबसे मिळत होते.  पोट शांत करण्यासाठी काहीही चालायचे. वडीलाना  परमनंट नोकरी नव्हती. शेवटी ते मिल मध्ये बदली कामगार होते. खूप हाल अपेष्टा सहन केल्या. पण आई वडीलानी  प्रेम मात्र पोटभर केले. खूप शिकायची इच्छा होती, पण गिरणी कामगारांच्या संपाने.......  खूप शिकण्याचे स्वप्न उद्ध्वस्त झाले.

     पुढे एक एक टप्पा पार करताना जाणवल, वास्तवाचे भान ठेवून छोट्या छोट्या गोष्टीत समाधानी राहील्यास जीवन आनंदात जगता येते. त्या काळातसुद्धा पावलोपावली कुणीतरी साथ देत होता. कोण ? ते आज कळतय, कारण जिथे जिथे अडचणी आल्या, तेथे तेथे अनपेक्षीत मदत मिळाली. कशी ते माहीत नाही. बऱ्याच आजारातून, अपघातातून वाचलो. पण भीती मात्र नव्हती. का कोण जाणे पण त्यावेळीही मी जगणार ही जबरदस्त खात्री होती मला.

     प्रत्येक ठिकाणी चांगली माणसे, मित्र मिळाले. अनुभवातुन बरेच  काही शिकलो. दरवेळी काहीतरी नविन शिकायची इच्छा हळूहळू पुर्ण होत होती. देवाकडे नेहमी मागायचो मला आयुष्याच्या अंतापर्यंत शिकतच रहायचय. त्याने साथ दिली. नंतर मागे वळून पाहीले नाही. त्याने खुप सुख दिलय. मी सुखी आहे.

     माझी सुखाची परीभाषा वेगळी आहे. भरभरून प्रेम करणारे आईबाप दिलेत. आज त्यांच छत्र माझ्या डोक्यावर आहे हे खुप मोठे सुख आहे. त्यांना रामराज्य पहाता याव ही बापुरायांच्या चरणी प्रार्थना. सुंदर सुशील व समजूतदार पत्नी आहे. एक मुलगी व एक मुलगा आहे. चांगली नोकरी आहे , चांगला बॉस आहे, चांगला शेजार आहे, जीव लावणारे प्रेमळ  मित्र आहेत. शांत झोप लागते बापुराया. तुुझ्या सावलीत मी सुखी व समाधानी आहेे.

     राहीली गोष्ट व्यसनाची, ह्या व्यसनापायी  काही सुचतच नाही बापुराया, तरिही ते व्यसन  सुटु नये हीच मनोमन इच्छा आहे. कारण ते व्यसनही तसेच आहे.
त्याचे नाव आहे तुझे अनन्य प्रेम.प्रेम.प्रेम.प्रेम.प्रेम.प्रेम.प्रेम.प्रेम.

0 comments: