तो भक्कम आधार



     २००० ते २००२ या कालावधीत अतीशय वाईट घटना माझ्या जीवनात घडल्या, संकटे एकमेकांचा हात धरुन साखळी करुन एकामागोमाग एक अशी अवतीर्ण झाली होती. थोडक्यात "दहा दिशानी विसकटलेली जीवनाची घडी" अतिशय नैराश्य आले होते. भलते सलते विचार मनाला व्यापून जीव गुदमरला होता.

     फक्त एका परमेश्वराच्या विश्वासावरच श्वास घेत होतो. शोधत होतो एक आधार, भक्कम आधार, ज्याच्याकडे माझ्या व्यथांवर उपाय सापडेल. एका मित्राचे शब्द कानावर पडले.  "जोपर्यंत सद्गुरुंची कृपा होत नाही तोवर जीवनात यश मिळत नाही." त्याच्या शब्दांवर विश्वास ठेवला व त्याने सांगीतलेला "ओम गुरवे नम:" हा जप चालू झाला. ध्यास घेतला होता  जीवाने सद्गुरुंचा.

     वेड्यासारखा शोध चालू होता. आणि  अचानक एकदा गुरुवारी न्यु इंग्लीश शाळा, वांद्रे येथे डॉ. अनिरुद्ध धैर्यधर जोशी यांच्या प्रवचनाला जाण्याचा योग आला. हा योगायोग नव्हता हे पुढे उमगले. पहील्या भेटीतच त्यानी आपलेसे केले. त्यांच्या प्रवचनात माझ्या प्रश्नांची उत्तरे मला सापडली. तरीही काळ जावा लागला विश्वास दृढ होण्यासाठी. दर गुरुवारी प्रवचनाला जाण्याच्या ओढीने त्यांचे व माझे एक वेगळेच नाते निर्माण झाले होते. त्यांचे आश्वासक हास्य, खाणाखूणानी मी पुरता ओळखुन गेलो होतो,  मी जो शोधत होतो तो भक्कम आधार तो हाच, होय हाच तो.

     जसजसा वेळ गेला तसतसे उलगडत गेले त्यांचे एक एक पैलू, विवीध क्षेत्रातील त्यांचे अफाट ज्ञान पाहून अचंबीत झालो होतो.  तेथील वातावरण वेगळेच होते. शिस्तबद्ध स्वयंसेवक, योग्य नियोजन, उपासना, मन एव्हाना शांत झाले होते. अडचणींचा जटील गुंता सुटुन संकटे परागंदा झाली होती.  निष्पर्ण खोडातून वृक्ष पुन्हा बहरला. फक्त ५ रुपयाच्या उपासना पुस्तीकेशिवाय मला एका नव्या पैशाचा खर्च झाला नव्हता. हे सगळे कसे घडले? असे घडू शकते??? मागे वळून पाहता माझा स्वत:चाच विश्वास बसत नव्हता. पण होय हे घडले होते. अशक्य ते शक्य झाले होते. हे फक्त खऱ्या सद्गुरु तत्त्वालाच शक्य आहे.

     बिघडलेल्या मला त्याने घडवल. माझ्या सर्व मित्रांना, ज्यांचा माझ्यावर विश्वास आहे, त्याना सांगू ईच्छीतो की आम्ही बी घडलो तुम्ही बी घडा.
अंबज्ञ बापुराया.
I love you my dad.
Your child.

2 comments:

  1. सदगुरुंच्या चरणी शरण जाता अवघा कायापालट होतो तो असा! १०८ % सत्य आणी केवळ सत्य !!!!

    ReplyDelete
  2. Thanks Sunitaji, Ek Vishwas Asava Purata Karta Harta Guru Aisa

    ReplyDelete